

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्याचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत इतिहास घडवला आहे. त्या अमेरिकन सैन्यात सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी महिला ठरल्या आहेत.
अपघातामुळे भारतीय लष्करात जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतरही त्यांनी अमेरिकेत ‘क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट’ म्हणून काम करत नवी वाट निवडली. ‘यूएसए मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ किताब जिंकत त्यांनी सौंदर्य क्षेत्रातही यश मिळवले.
प्रशिक्षणादरम्यान त्यांना ‘मार्क्समनशिप पदक’ मिळाले असून बॅचमध्ये सर्वोच्च गुणही मिळवले. सध्या त्या अमेरिकन सैन्याच्या मेडिकल विभागात कार्यरत आहेत.







