

व्हेनेझुएलामध्ये अवघ्या ४० सेकंदांत आलेल्या सलग दोन भूकंपांनी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला असून ४,३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ७० हजारांपेक्षा अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.ला ग्वाइरा, काराबालेडा आणि काटिया ला मार या भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून १०० हून अधिक इमारती कोसळल्या आहेत. अनेक नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. विविध देशांकडून मदत पाठवली जात असून आपत्कालीन यंत्रणा सतत मदतकार्यात गुंतल्या आहेत.







