

रत्नागिरी जिल्ह्यात आज समाधानकारक पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकूण 876.33 मिमी पर्जन्यमान झाले आहे. आजचा सरासरी पाऊस 97.37 मिमी इतका नोंदविण्यात आला आहे.
तालुकानिहाय पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे:
मंडणगड येथे सर्वाधिक 117.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल गुहागर येथे 108.00 मिमी, दापोली येथे 107.14 मिमी आणि राजापूर येथे 106.37 मिमी पाऊस झाला. चिपळूण येथे 93.88 मिमी, रत्नागिरी येथे 94.11 मिमी, लांजा येथे 89.60 मिमी, खेड येथे 86.57 मिमी तर संगमेश्वर येथे सर्वात कमी 73.41 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसाठी पुढील काही तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोकणातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मासेमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासावा, तर नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे.







